वनाधिकारी बर्डेकर यांची सुटका

August 2, 2010 8:48 AM0 commentsViews: 2

2 ऑगस्ट

वनविभागाचे अधिकारी विलास बर्डेकर यांची अखेर अतिरेक्यांनी सुटका केली आहे. बोडो अतिरेक्यांनी अरूणाचल प्रदेशातून त्यांचे अपहरण केले होते. तब्बल 81 दिवसांनंतर त्यांची सुटका झाली आहे.

अरुणाचल प्रदेशात असलेल्या ईगल्स नेस्ट वाईल्डलाईफ अभयारण्यात बर्डेकर फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. त्यावेळी 8 बोडो अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केले होते.

त्यांच्या सुटकेसाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरू होते. अखेर तीन महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली.

राज्याच्या वनविभागाने ही माहिती दिली आहे. बर्डेकर वन खात्यांच्या सामाजिक वनिकरण विभागाचे अधिकारी आहेत.

close