कॉमनवेल्थ भ्रष्टाचाराविरोधात भाजप आक्रमक

August 2, 2010 9:48 AM0 commentsViews:

2 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्सच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राजधानी दिल्लीत जोरदार निदर्शने केली.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा शीला दीक्षित सरकारवर आरोप आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून संसदेच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांवर पाण्याचा फवारा मारून त्यांना पांगवले.

close