कोकण रेल्वे अनिश्चित

August 2, 2010 10:12 AM0 commentsViews: 1

2 ऑगस्ट

कोकण रेल्वेची वाहतूक आता कधी सुरळीत होईल, याबाबत अनिश्चितता आहे. कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकांनीच याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे.

पावसाचे प्रमाण कमी होऊन नैसर्गिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत कोकण रेल्वे कधी सुरळीत होईल हे सांगता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

कोकण रेल्वेने सुरुवातीला 30 जुलैला वाहतूक सुरळीत करण्याचा दावा केला होता.

परंतू आसोडे जवळ कोसळलेल्या दरडीची माती पुन्हा पुन्हा रेल्वे रुळांवर येत आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी विलंब लागत आहे.

close