बीपीटीबाबत काँग्रेस बॅकफूटवर

August 2, 2010 11:18 AM0 commentsViews: 2

2 ऑगस्ट

बीपीटीला मुंबईबाहेर हलवण्यास राष्ट्रवादीने कडाडून विरोध केल्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. बीपीटी मुंबईबाहेर हलवण्याचा काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव नाही.

याबाबत बंदरे विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विचारणा करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या जलवाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून बीपीटी मुंबईबाहेर हलवण्याची मागणी केली होती.

तसेच आपल्या मागणीचा त्यांनी जाहीर उच्चारसुद्धा मीडियासमोर केला होता. पण राष्ट्रवादीने विरोध केल्यानंतर आता काँग्रेसने हा प्रस्ताव मागे घेतला आहे.

close