शशी थरूर शनिमहाराजांच्या चरणी

August 2, 2010 11:34 AM0 commentsViews: 1

2 ऑगस्ट

आयपीएलमधील वादात मंत्रीपद गमावलेले केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांनी आज शनीमहाराज आणि साईबाबाचरणी धाव घेतली.

आणि आपल्यावरची 'इडापीडा' टळो, असा नवस केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहुचर्चित मैत्रिण सुनंदा पुष्करही होती.

शनिमहाराजांना अभिषेक घातल्यानंतर त्यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले.

त्यांनी यावेळी पती पत्नी प्रमाणे साईबाबांची धुपारतीसुध्दा केली. पत्रकारांशी मात्र त्यांनी यावेळी बोलणे टाळले.

close