गौतम गंभीर टीमबाहेर

August 2, 2010 1:48 PM0 commentsViews: 2

2 ऑगस्ट

भारत आणि श्रीलंकेदरम्यानची तिसरी टेस्ट उद्यापासून कोलंबोत सुरू होत आहे.

पण या मॅचमध्येही भारताचा भरवशाचा बॅट्समन गौतम गंभीर खेळणार नाही. दुखापतीमुळे गंभीर दुसर्‍या टेस्ट मॅचलाही मुकला होता. आणि अजूनही दुखापतीतून तो पूर्णपणे सावरलेला नाही.

त्यामुळे गंभीरच्या जागी दुसर्‍या टेस्टमध्ये संधी मिळालेला मुरली विजय टीममध्ये कायम राहील.

गंभीरसोबतच हरभजन सिंगही तिसर्‍या टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.

close