औरंगाबाद विमानतळाला शेतकर्‍यांचा विरोध

August 2, 2010 3:15 PM0 commentsViews: 1

2 ऑगस्ट

औरंगाबाद शहरातील चिकलठाणा, मुकुंदवाडी येथील आणखी 245 एकर जमीन विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी संपादित केल्या जाणार आहेत.

मात्र जीव गेला तरी एक इंचही जमीन संपादित करू देणार नसल्याची भूमिका येथील शेतकरी आणि रहिवाशांनी घेतली आहे.

या परिसरात सरकारने वारंवार शेतकर्‍यांच्या बागायती जमिनींवर नांगर फिरवून आपले प्रकल्प मार्गी लावले.

प्रथम चिकलठाणा विमानतळ, नंतर औद्योगिक वसाहती, सिडको, महानगरपालिका, तर तब्बल चार वेळा विमानतळासाठी जमिनी संपादित केल्या गेल्याने येथील नागरिकांचा वनवास आजही संपलेला नाही.

close