दादरमधल्या स्कायवॉकला मनसेचा विरोध

October 24, 2008 4:59 AM0 commentsViews: 1

24 ऑक्टोबर, मुंबई – मुंबईतल्या दादरमध्ये बांधण्यात येणार्‍या स्कायवॉकचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. बॅनरच्या माध्यमातून मनसेनं हा विरोध दर्शवला आहे. दुकानदार आणि स्थानिकांचा या स्कायवॉकला विरोध असल्यामुळे हा स्कायवॉक बांधू देणार नाही, असं मनसेने म्हटलं आहे. हा स्कायवॉक बांधल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा धमकी वजा इशारा मनसेने या बॅनर मधून दिला आहे.

close