‘एमआयडीसीसाठी सिंचनाखालील जमीन नाही’

August 2, 2010 3:21 PM0 commentsViews: 2

2 ऑगस्ट

एमआयडीसीसाठी भूसंपादन करत असताना सिंचनाखालील जमीन संपादित करणार नाही, असे उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांनी कोल्हापुरात स्पष्ट केले.

जमीन संपादीत करत असताना शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन संपादन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूर विमानतळासाठी शेतकर्‍यांकडून संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात 60 कोटी रुपयांच्या धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतकर्‍यांकडून शंभर टक्के जमीन संपादित केली जाते. त्यानंतर मात्र शेतकर्‍याकडे काहीही राहात नाही. त्यामुळे राज्य सरकारने शंभर टक्के जमिनीपैकी 15 टक्के जमीन शेतकर्‍यांना उद्योगासाठी परत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही दर्डा यांनी सांगितले.

close