बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचार्‍यांची निदर्शने

August 2, 2010 3:44 PM0 commentsViews: 6

2 ऑगस्ट

पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगरच्या ऑफिससमोर बँंकेच्याच कर्मचार्‍यांनी आज निर्दशने केली.

बँक ऑफ महाराष्ट्राचे चेअरमन आलम परेरा हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप यावेळी या कर्मचार्‍यांनी केला. या मोर्चामध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सुमारे नऊशेहून अधिक कर्मचारी सहभागी झाले.

बदली आणी पदोन्नती संदर्भात आलम परेरा हे एकतर्फी निर्णय घेऊन कर्मचार्‍यांना वेठीस धरत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

बदली आणि पदोन्नती संदर्भातील मागण्या मान्य न झाल्यास 9 ऑगस्ट रोजी राज्यभरातील बँक कर्मचारी संपावर जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

close