पुणे विद्यापीठात बोंबाबोंब आंदोलन

August 2, 2010 3:59 PM0 commentsViews: 4

2 ऑगस्ट

पुणे विद्यापीठातील कॅन्टीन मालकाने मनमानी पद्धतीने भाववाढ केल्याची तक्रार करत आज विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या ऑफिससमोर बोंबाबोंब आंदोलन केले.

राज्यातील महाविद्यालयातील कॅन्टीनपेक्षा पुणे विद्यापीठातल्या कॅन्टीनमध्ये दिल्या जाणार्‍या खाद्य पदार्थांचे दर जास्त आहेत, शिवाय इथले खाद्य पदार्थ भेसळयुक्त असतात, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

ही बाब कुलगुरुंच्या वेळोवेळी लक्षात आणून दिल्यानंतरही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. आणि मोर्चा काढून कुलगुरुंच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले.

मागण्या पूर्ण न झाल्यास 6 ऑगस्टपासून विद्यापीठ बंद करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. तर कुलगुरू नसल्याचे कारण पुढे करत विद्यापीठ प्रशासनाने या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

close