रत्नागिरीत शीळ धरणाला भेगा

August 3, 2010 9:26 AM0 commentsViews: 8

3 ऑगस्ट

कोकणात जमीन खचण्याच्या घटना सुरूच आहेत. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या शीळ धरणाला जमीन खचल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या धरणाच्या आजूबाजूच्या जमिनीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भेगा गेल्या आहेत. त्यामुळे धरणातून जॅकवेलकडे जाणार्‍या कालव्याची संरक्षक भिंतही खचली आहे.

त्यामुळे हा कालवा केंव्हाही बुजला जाऊन रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद पडण्याची शक्यता आहे.

धरण परिसरातील सुमारे 10 एकर जमिनीत या भेगा गेल्यामुळे येथील शेतीही धोक्यात आली आहे.

या सगळ्या परिस्थितीकडे रत्नागिरी नगरपरीषदेचे मात्र दुर्लक्ष आहे.

close