जैतापुरात आता अटकसत्र

August 3, 2010 9:38 AM0 commentsViews: 1

3 ऑगस्ट

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. गावकरी आणि सरकार यांच्यातील संघर्षाला काल हिंसक वळण लागले.

गावकर्‍यांनी काल ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांना मारहाण केली होती. त्याप्रकरणी आज गावकर्‍यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काल प्रकल्पाच्या जागेवर मातीचे नमुने घेण्यासाठी ट्रक मधून जाणार्‍या मुंबईच्या एका खाजगी ठेकेदाराच्या 15 कर्मचार्‍यांना गावकर्‍यांनी अडवून मारहाण केली होती. ट्रकच्या काचा फोडल्या होत्या.

त्या ठिकाणी असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबललाही गावकर्‍यांना रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

या प्रकरणात 3 महिलांसह 18 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत. तर कालच या प्रकरणी चार जणांना पोलीसांनी अटक केली होती.

close