फॉगिंग मशिन्स खातायत धूळ

August 3, 2010 10:22 AM0 commentsViews: 1

3 ऑगस्ट

मुंबईतील मलेरियाला आळा घालण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे, असे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. पण या प्रशासनाच्या बेमुर्वत कारभाराचा एक नमुना समोर आला आहे. आणि तो म्हणजे डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषधांची फवारणी करणारी एकूण 235 फॉगिंग मशिन्स धूळ खात पडून आहेत.

यापैकी 227 हाताने फवारणी करणार्‍या छोट्या मशिन्स आहेत. तर 8 स्वयंचलित मोठ्या मशिन्स आहेत. गेल्या वर्षी यापैकी एका मशिनचा अपघात होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यूही झाला होता.

या घटनेनंतर आरटीओने या मशिन्सच्या वापराला परवानगी नाकारली होती. काही मशिन्स तर फक्त 10 मिनीटे चालतात आणि त्यानंतर बंद पडतात.

त्यामुळे या मशिन्स खरेदीमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

close