काश्मीरमध्ये दोन बळी

August 3, 2010 10:32 AM0 commentsViews: 1

3 ऑगस्ट

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. निदर्शकांना पांगवण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात आज 2 जणांचा बळी गेला.

तर खोर्‍यातील कर्फ्यू अजूनही कायम आहे. त्यातच फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी ईदगाहपर्यंत रॅली काढण्याचे आवाहन केले आहे. पण 2 जणांचे बळी गेल्यानंतर येथील परिस्थिती अजून गंभीर झाली आहे. त्यामुळे या रॅलीला परवानगी नाकारण्यात येण्याची शक्यता आहे.

खोर्‍यामध्ये आता 5 हजारांहून अधिक सीआरपीएफ जवानांची कुमक पाठवण्यात आली आहे. पण सर्वात धोक्याची बाब म्हणजे, गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांमध्ये काही वेळा, दहशतवादीही मिसळत आहेत. आणि ते आंदोलकांमध्ये घुसून पोलिसांवर गोळीबार करत आहेत.

पण आंदोलक मात्र ही गोष्ट स्वीकारायला तयार नाहीत. गेल्या काही आठवड्यांमध्ये काश्मीर खोर्‍यात 41 जणांचा बळी गेला आहे.

close