नांदेड गुरू-ता-गद्दी सोहळ्यासाठी सज्ज

October 24, 2008 5:04 AM0 commentsViews: 6

24 ऑक्टोबर, औरंगाबाद – ऐतिहासिक गुरू-ता-गद्दी सोहळा आता एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. नांदेडच्या गुरू गोविंदसिंग गुरुव्दारा परिसरात आता या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारीची लगबग सुरू आहे. शीख धर्मीयांसाठी या शतकातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणून गुरू-ता-गद्दीकडं बघितलं जातं. गुरू-ता-गद्दी म्हणजे ग्रंथाला गुरू मानणं. तीनशे वर्षांपूर्वी शीखांचे दहावे धर्मगुरू , गुरू गोविंदसिंग यांनी नांदेड इथे ग्रंथाला गुरूस्थानाचं अधिष्ठान दिलं. त्या समारंभाला तीनशे वर्षं पूर्ण होत असल्याने नांदेडमध्ये गुरूद्वारा परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण आहे. गुरूव्दारात दररोज कीर्तन, प्रवचन आणि ग्रंथवाचन केलं जात आहे. शीख समाजाचे नागरिक रोज गुरूद्वारात येऊन त्यात सहभागी होतात. नांदेडमध्ये ठिकठिकाणी लंगर सुरू झाले आहेत. या लंगरमध्ये भोजनासाठी सर्व नांदेडकरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. गुरू-ता- गद्दी कार्यक्रमांसाठी आता सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.

close