बार्शीत पोलीस स्टेशनमध्ये महिलेने घेतला गळफास

August 3, 2010 10:45 AM0 commentsViews: 8

3 ऑगस्ट

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुरेखा हनमंते असे या महिलेचे नाव आहे. तीन महिन्यांपूर्वी तिला चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती.

31 जुलैला तिची सुटका करण्यात आली. त्याचवेळी सुरेखाने कोर्टात गोंधळ घातला होता. त्यामुळे तिला अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर पोलिसांनी तिला पुन्हा अटक केली.

दरम्यान पोलीस स्टेशनमध्येच सुरेखाचा मृत्यू झाला. पोलिसांनी कोठडीत छळल्यामुळेच सुरेखाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

याप्रकरणी दोषी असलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुरेखाच्या नातेवाईकांनी केली आहे.

close