बिग बॉसच्या खुर्चीवर सलमान

August 3, 2010 11:52 AM0 commentsViews: 5

3 ऑगस्ट

कलर्स चॅनलवर आता लवकरच बिग बॉसची धूम पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. बिग बॉस सिझन थ्री मध्ये पॉप फिलॉसॉफर म्हणून बिग बीची जादू दिसली.

पण आता बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये मात्र अमिताभ दिसणार नाही. बिग बॉस सिझन 4 ची ही खुर्ची सांभाळणार आहे, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान…

सलमान खान या नव्या सिझनचा होस्ट असेल. पण सलमानची ही टक्कर असणार आहे, अमिताभ बच्चन यांना. कारण बिग बीच्या कौन बनेगा करोडपती या शोच्या वेळेसच बिग बॉसमधील सल्लूमियाँचा दम पहायला मिळेल.

बिग बॉसमधील स्पर्धकांची नावे मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत.

close