रत्नागिरी-गोवा वाहतूक 10 दिवस बंद

August 3, 2010 1:43 PM0 commentsViews: 9

3 ऑगस्ट

कोकण रेल्वेतील रत्नागिरी ते गोवा वाहतूक 10 दिवस बंद आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत.

रत्नागिरी ते अडवलीदरम्यान रेल्वे प्रवाशांची सोय करण्यासाठी कोकण रेल्वेने एस. टी. बसेस भाड्याने घेतल्या आहेत. अडवलीतून गोव्याकडे जाणारी रेल्वे सेवा सुरू आहे.

यादरम्यान गेल्या 10 दिवसांत कोकण रेल्वेने एसटी बसमधून 50 हजारांहून जास्त प्रवाशांची मोफत वाहतूक केली आहे. यासाठी रेल्वेला एक कोटी रुपयाहून जास्त खर्च झाला आहे.

रेल्वेसेवा सुरळीत झाली नसल्यामुळे हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.

close