बर्डेकरांना झाले मृत्यूचे दर्शन…

August 3, 2010 2:40 PM0 commentsViews: 3

3 ऑगस्ट

बोडो अतिरेक्यांनी अपहरण केलेले विलास बर्डेकर हे आज मुंबईमध्ये सुखरुप परतले. मुंबईमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला.

तब्बल 3 महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली. या 81 दिवसांमधील अनुभव त्यांनी आज मीडियासोबत शेअर केले.

बोडो अतिरेक्यांनी अरूणाचल प्रदेशातून त्यांचे अपहरण केले होते. अरुणाचल प्रदेशात असलेल्या ईगल्स नेस्ट वाईल्डलाईफ अभयारण्यात बर्डेकर फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. त्यावेळी 8 बोडो अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केले होते.

त्यांच्या सुटकेसाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरू होते. हे प्रयत्न यशस्वी झाल्याचा आनंद त्यांनीही व्यक्त केला आहे.

close