गणेश मंडपांच्या खड्‌ड्यांचे डिपॉझिट रद्द

August 3, 2010 3:13 PM0 commentsViews: 4

3 ऑगस्ट

येत्या 11 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी आज मुंबई महानगरपालिका आणि सार्वजनिक गणेशोत्सव समिती यांची बैठक झाली.

या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आणि गणेशमूर्तीकारांकडून घेतले जाणारे दोन हजार रुपयांचे डिपॉझिट यंदा घेतले जाणार नाही.

गणेशोत्सव मंडळांकडून आणि मूर्तीकारांकडून मंडप बांधताना रस्त्यांवर होणारे खड्डे बुजवण्याची जबाबदारी गणेशोत्सव मंडळांनी आणि मूर्तीकारांनी स्वीकारली आहे.

त्यामुळे या खड्‌ड्यांच्या बदल्यात घेतले जाणारे डिपॉझिट रद्द करण्यात आले आहे.

close