‘दारू पार्टी करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई करा’

August 3, 2010 3:20 PM0 commentsViews: 2

3 ऑगस्ट

पुण्याजवळ थेऊर येथील फार्म हाऊसवर दारू पार्टी करणार्‍या सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेने केली आहे.

या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंबायोसिस कॉलेजमध्ये निदर्शने केली.

दुधाच्या पिशव्या आणि शहाळी गळ्यात अडकवून सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंबायोसिसमध्ये निदर्शने केली.

संस्थेचे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांनी आपलीही मान शरमेने खाली गेल्याचे सांगत, या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

close