कॉलर ट्यूनवर लागणार करमणूक कर

August 3, 2010 3:52 PM0 commentsViews: 5

3 ऑगस्ट

मोबाईलवर ऐकायला मिळणार्‍या कॉलर ट्यूनवर करमणूक कर लावण्याचा सरकारचा विचार आहे. कॉलर ट्यूनसोबतच सायबर कॅफे, व्हिडिओ पार्लर्सवरही कर लावण्याचा सरकारचा विचार आहे.

कुठल्याही मोबाईल धारकाने दुसर्‍याला फोन केल्यानंतर त्याला ऐकायला मिळणारी कॉलर ट्यून त्याचे मनोरंजन करते. त्यामुळे आता त्यावर करमणूक कर लावण्याचा सरकारचा विचार आहे.

मोबाईलवर कॉलर ट्यून सुरू करण्यासाठी दरमहा 30 रुपये भरावे लागतात. आता त्याच्यावरच 25 टक्के करमणूक कर लावण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रमेश कुमार यांनी ही माहिती दिली. मंजुरीसाठी हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला. नंतर तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे मांडला जाणार आहे.

close