कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणी पिंपरीत सीबीआयचे छापे

August 4, 2010 8:42 AM0 commentsViews: 2

4 ऑगस्ट

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीवर ताशेरे मारले जात आहेत…कॉमनवेल्थ गेमच्या भ्रष्टाचाराबाबतही चर्चा होतेय…त्याचवेळी सीबीआयने या प्रकरणी पुण्याजवळ पिंपरीत छापे मारले.

सीआयआरटी अर्थात सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्टवर 12 जुलै रोजी सीबीआयने हे छापे टाकले. या छापासत्रात अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सीआयआरटी ही कंपनी वाहनांच्या स्पेअर पार्ट्सना दर्जा देण्याचे काम करते. कॉमनवेल्थ गेममध्ये वापरण्यात येणार्‍या वाहनांना लागणारे स्पेअर पार्ट्ससाठी या संस्थेने दिलेल्या दर्जाबाबत सीबीआयने हे छापे मारले आहेत.

या प्रकरणी सेंट्रल इन्स्टिीट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

close