कलमाडी चौकशीसाठी तयार

August 4, 2010 8:49 AM0 commentsViews: 5

4 ऑगस्ट

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीवर ताशेरे मारले जात असतानाच आता आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी आता आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचे म्हटले आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या तयारीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. दरम्यान कॉमनवेल्थ स्पर्धा 2010चे मुख्य पुरस्कर्ते भारतीय रेल्वेनेही या सगळ्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

तसेच रेल्वेने यासंदर्भात आयोजन समितीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. रेल्वेने या स्पर्धेसाठी 100 कोटी रूपयांचे अनुदान दिले आहे. रेल्वे आपले अनुदान सध्या तरी परत घेणार नसली, तरी स्पष्टीकरणानंतर यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

कलमाडी यांनी नेमलेल्या तीन सदस्यांची समिती आज आपला अहवालही सादर करणार आहे.

हा मुद्दा संसदेत चर्चेसाठी आणण्याचा भाजप आणि डाव्यांचा प्रयत्न आहे. संयुक्त संसदीय समितीतर्फे या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

close