दंतेवाडात नक्षलवाद्यांशी चकमक

August 4, 2010 9:50 AM0 commentsViews: 1

4 ऑगस्ट

दंतेवाडामध्ये किरणडूल गावातील गुमियापाल जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चार तासांपासून चकमक सुरू आहे.

एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर 100 हून अधिक नक्षलवाद्यांनी 60 पोलिसांना घेराव घातल्याचे समजते.

या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान 300 जवानांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली आहे. पण पावसामुळे हेलिकॉप्टर उतरू शकत नाही.

तर वायरलेसचा संपर्क तुटल्याने जखमींची संख्याही कळत नाही.

इथे जोरदार पाऊसही सुरू आहे

close