मलेरिया पेशंटच्या रांगा

August 4, 2010 11:57 AM0 commentsViews: 2

4 ऑगस्ट

मुंबईत मलेरियाचे पेशंट वाढतच चालले आहेत. यासाठी आता महापालिकेने राज्य सरकारकडे मदत मागितली आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि रेल्वे कर्मचार्‍यांसाठी असलेल्या हॉस्पिटल्समध्ये आता इतर पेशंटवर उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महापालिकेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

घाटकोपर बर्वेनगर येथील संत मुक्ताबाई हॉस्पिटल पालिकेच्या 16 पेरिफिरल हॉस्पिटल्सपैकी एक महत्त्वाचे हॉस्पिटल आहे. मात्र या हॉस्पिटलमध्ये नर्सच्या 14 जागा रिक्त आहेत.

तर चतुर्थ श्रेणी कामगारांच्या 41 जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम म्हणून पेशंटना रक्त तपासणीसाठी तासन्‌तास खोळंबून राहावे लागत आहे.

close