शेअर बाजार वधारला

August 4, 2010 2:45 PM0 commentsViews: 2

4 ऑगस्ट

शेअर बाजाराकडे लक्ष असणार्‍यांसाठी बर्‍याच दिवसांनी एक चांगली बातमी आहे. मुंबई शेअर बाजाराने आज 30 महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली.

ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 57 अंकांनी वधारलेला होता. आणि ट्रेडिंग संपताना तो 100 पाँइंटने वधारून 18,271 वर बंद झाला.

फेब्रुवारी 2008 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. सगळ्या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रात आज तेजी होती.

तर आज निफ्टी बंद झाला 5,467 वर.

close