पार्टीबहाद्दर होणार समाजसेवक

August 4, 2010 3:22 PM0 commentsViews: 6

4 ऑगस्ट

फ्रेंडशिप डे निमित्त दारू पार्टी करणार्‍या पाच विद्यार्थ्यांना सिंबायोसिस कॉलेजने 15 दिवसांसाठी निलंबित केले आहे.

तर पार्टीचे आयोजक आणि मद्यपान केलेल्या 85 विद्यार्थ्यांना 15 दिवस समाजसेवा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

याशिवाय पार्टीत सहभागी सर्व झालेल्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये महिन्यातून तीन वेळा उशिरा येण्याची मिळणारी सवलत बंद करण्यात आली आहे.

यापुढे हॉस्टेलमध्ये परत येण्याची वेळ रात्री 10.30 ऐवजी 9.30 करण्यात आली आहे. सिंबायोसिस संस्थेच्या चौकशी समितीने हे निर्णय घेतले आहेत.

close