दरबारींची गच्छंती…

August 5, 2010 12:27 PM0 commentsViews: 1

5 ऑगस्ट

कॉमनवेल्थमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे त्रिभुवन दरबारी यांची हकापट्टी झाली आहे.

कॉमनवेल्थ आयोजन समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरबारी हे कॉमनवेल्थ संयोजन समितीचे सहसंचालक आहेत.

कॉमनवेल्थमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी कॉमनवेल्थने एक अंतरीम चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने आज अहवाल सादर केला. त्यानुसार कारवाईचा पहिला हातोडा पडला तो दरबारी यांच्यावर…

कलमाडींशी नाते…

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि टी. एस. दरबारी यांच्यातील संबंधांवर एक नजर टाकूयात…

एप्रिल 2010मध्ये 28 लाखांच्या हिर्‍यांची तस्करी केल्याचा आरोप दरबारी यांच्यावर आहे. पण या आरोपावरुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ नये, असा पवित्रा कलमाडी यांनी त्यावेळी घेतला होता. क्रीडा मंत्रालयाला त्यांनी तसे पत्रही लिहिले होते.

पण क्रीडा सचिव सिंधुश्री खुल्लर दरबारी यांच्या विरुद्ध होते. आणि दरबारींवर कारवाई करण्याची विनंती त्यांनी कलमाडींना पत्र लिहून केली होती.

दरम्यान दरबारी यांनी आपण आरोपी नसून साक्षीदार असल्याचे एक निवेदन कस्टम विभागाकडे दिले होते. त्यानुसार दरबारी दोषी नसल्याचे कलमाडी सांगत होते.

close