महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

August 5, 2010 1:06 PM0 commentsViews: 36

5 ऑगस्ट

सांगली जिल्ह्यातील नरवाड या गावात मुलभूत सोयीसुविधांच्या मागणीसाठी गावातील महिलांनी ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकले.

या गावात सार्वजनिक शौचालये नाहीत, रस्ते दुरवस्थेत आहेत, गावात एसटी सेवाही नाही. तसेच लोकांकडून पाच हजार रुपये घेऊनही घरकुल योजना राबवली गेलेली नाही. भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणी योजनाही रखडली आहे.

अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर महिलांनी आंदोलन करत थेट ग्रामसेवक आणि सरपंच मंदाकिनी शिंगे यांना घेराव घातला. निदर्शने करत विविध मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्या.

आणि त्यानंतर या महिलांनी ग्रामपंचायतीला टाळा ठोकला. मागण्या लवकर मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे.

close