कलमाडींचे मोहरे बाद

August 5, 2010 1:33 PM0 commentsViews: 1

5 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्समधील घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत चौघांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कलमाडींचे अत्यंत निकटवर्तीय समजल्या गेलेल्या दोघांचाही यात समावेश आहे.

त्यात त्रिभुवन दरबारी यांचा समावेश आहे. कॉमनवेल्थ आयोजन समितीच्या उच्चस्तरीय समितीनं हा निर्णय घेतलाय. दरबारी हे कॉमनवेल्थ संयोजन समितीचे सहसंचालक होते.

कॉमनवेल्थच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एक अंतरिम चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर ही हकालपट्टीची कारवाई करण्यात आली.

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीचे कोषाध्यक्ष अनिल खन्ना यांनीही आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.

आज अपेक्षेप्रमाणे सुरेश कलमाडी पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले. त्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेणार्‍या भुनोत यांनी कलमाडी हे आवश्यकतेप्रमाणे यापुढे पत्रकार परिषदेला हजर राहतील, असे सांगितले.

close