साहित्य संमेलन निवडणुकीसाठी सहा अर्ज

August 5, 2010 2:16 PM0 commentsViews: 1

5 ऑगस्ट

ठाण्यात होणार्‍या 84 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटचा दिवस होता.

ही निवडणूक रंगतदार होणार आहे. कारण या निवडणुकीसाठी यावेळी सर्वाधिक म्हणजे सहा जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अध्यक्षपदासाठी उत्तम कांबळे, चंद्रकुमार नलगे, गिरीजा कीर, अशोक बागवे, सच्चिदानंद शेवडे, वामनराव पाठक यांनी अर्ज दाखल केले आहेत.

अर्ज स्वीकारण्याची मुदत 12 ऑगस्टला संपत आहे.

25, 26 आणि 27 डिसेंबरला ठाणे इथे हे संमेलन होणार आहे.

close