भारतीय अधिकार्‍यांची पाकिस्तानच्या कोर्टात साक्ष

August 5, 2010 2:31 PM0 commentsViews: 1

5 ऑगस्ट

26/11 हल्ल्याचा तपास करणार्‍या भारतीय अधिकार्‍यांना पाकिस्तानी कोर्टापुढे साक्ष देण्याची परवानगी भारताने दिली आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे हे अधिकारी साक्ष देतील. सरकार यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे.

अजमल कसाबचा जबाब घेतलेले मॅजिस्ट्रेट आणि तपास अधिकारी यांच्या साक्षीची परवानगी पाकिस्तानने भारत सरकारकडे मागितली होती.

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकी-उर- रेहमान लख्वी याच्यावरचे गुन्हे कसाबच्या कबुलीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे तपास अधिकार्‍यांची साक्ष महत्त्वाची असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

close