अस्वलीच्या हल्ल्यात चौघे ठार

August 5, 2010 2:36 PM0 commentsViews: 1

5 ऑगस्ट

अमरावती जिल्ह्यात मेळघाटमध्ये चवताळलेल्या अस्वलीने केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले.

बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जारीदा गावात ही घटना घडली. मृतांमध्ये वनरक्षक, केंद्रप्रमुख, एक विद्यार्थी आणि आणखी एकाचा समावेश आहे.

या घटनेमुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान वन विभागाने या अस्वलीला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.

या भागात अस्वलांची प्रचंड दहशत आहे. शिवाय या परिसरात गेल्या 15 दिवसांपासून वीज गायब आहे.

close