बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

August 5, 2010 2:42 PM0 commentsViews: 5

5 ऑगस्ट

चंद्रपूरच्या नागभीडजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

गोदेपार गावात सकाळी साडेआठ वाजता घटना आहे.

या हल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.

या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या वनाधिकार्‍यांना आणि गावकर्‍यांना एक बिबट्या मेलेल्या अवस्थेत आढळला. या बिबट्याचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.

close