लेहमध्ये ढगफुटी : 60 मृत्यूमुखी

August 6, 2010 12:46 PM0 commentsViews: 95

06 ऑगस्ट

जम्मू आणि काश्मीरमधल्या लेहमध्ये ढगफुटी झाली आहे या ढगफुटीत 60 जणांचा मृत्यू झाला. तर 300 पेक्षा जास्त जण जखमी असण्याची शक्यता असल्याचं समजतंय. सर्व जखमींवर आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

लेहमध्ये बहुतांश घरं मातीची असल्यामुळे तिथे चिखल झाला आहे. तर घरांच्या ढिगार्‍याखाली अनेकजण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. तसेच लेह एअरपोर्ट आणि सीआरपीएफ कॅम्पमध्ये पाणी घुसलं आहे. एअरपोर्टच्या धावपट्टीवर मोठ्याप्रमाणावर माती आल्यामुळे हवाई वाहतूक थांबवण्यात आली.

या ढगफुटीत 3 जवानांचा मृत्यू झाला. लेहकडे जाणारे मनाली-लेह आणि श्रीनगर-लेह हे दोन्ही महामार्गही सध्या बंद आहेत. त्याचबरोबर वातावरण खराब असल्यामुळे मदतकार्यात अनेक अडचणीत येत आहे. 10 हजार जवानांच्या वेगवेगळ्या तुकड्यांचं मदतकार्य सुरु आहे. पंतप्रधान रिलीफ फंडातून जखमींना 50 हजार आणि मृतांच्या नातेवाईकांना 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली.

ढगफुटी म्हणजे काय ?

ढगफुटी म्हणजे पावसाचं रौद्र रूपअवघ्या काही मिनिटांत मुसळधार पाऊस होतोकाहीवेळा गारा, विजेच्या कडकडाटासह पाऊसढगफुटीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकतेउंचावर असणार्‍या ढगांमुळे ढगफुटी होतेकाहीवेळा ढग 15 किलोमीटरवर असतातताशी 100 मिलीमीटर इतका पाऊस पडू शकतो

close