कॉमनवेल्थ घोटाळ्यावरुन लोकसभेत गदारोळ

August 6, 2010 12:56 PM0 commentsViews: 2

06 ऑगस्ट

कॉमनवेल्थ खेळांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवरामुळे आज लोकसभेतील वातावरण चांगलंच तापलं होतं. विरोधकांनी एकत्रितपणे सरकारला घेरले आणि गैरव्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. कॉमनवेल्थमधल्या गैरव्यवहारावर सोमवारी चर्चा करायला सरकारने तयारी दाखवली. पण चर्चा आजच व्हावी आणि पंतप्रधानांनी त्याला उत्तर द्यावं, अशी मागणी मुलायम सिंग यांनी केली.

भाजपने स्वतंत्र चौकशीची मागणी केली. राजदचे लालू यादव म्हणाले की लोकांपुढे आलेला गैरव्यवहार हे हिमनगाचे टोक असून भ्रष्टाचाराचा खरा आकडा त्याहून मोठा आहे. तर काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी कॉमनवेल्थ खेळांचं समर्थन केले. सरकार उत्तर देत नसल्याने जदयूच्या शरद यादवांनी सभात्याग केला. संसदेत चर्चा सुरू असताना बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यानी जोरदार निदर्शनं केली.

close