भारतासमोर 257 रन्सचं आव्हान

August 6, 2010 1:05 PM0 commentsViews: 6

06 ऑगस्ट

कोलेंबोत सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्ट मॅचमध्ये भारतासमोर विजयासाठी 257 रन्सचं आव्हान श्रीलंकेनं ठेवल आहे.मॅचच्या चौथ्या दिवशी भारतीय बॉलर्सने चांगली कामगिरी करत श्रीलंकन बॅट्समनना जास्त काळ पीचवर टीकू दिलं नाही.

श्रीलंकेची आजच्या दिवसाची 45 रन्सनी सुरुवात झाली पण ओझाने जबरदस्त बॉलिंग करत भारताला सुस्थितीत आणून ठेवले. ओझाने पहिल्यांदा रणदीव त्यानंतर जयवर्धने आणि नंतर कॅप्टन संगकाराला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर अमित मिश्रानेही दोन विकेट्स घेतल्या त्यानंतर मात्र समरविराने हाफ सेंच्युरी ठोकत श्रीलंकेची भारतावरची आघाडी 250 रन्सच्यावर नेऊन ठेवली .अजंता मेंडिस आणि समरविराने नवव्या विकेटसाठी 90 रन्सच्या वर पार्टनरशीप करत इनिंग लांबवली. अखेर अभिमन्यू मिथुनने समरविराला 83 रन्सवर आऊट करण्यात यश मिळवले.

close