मोहन तोंडवळकर काळाच्या पडद्याआड

August 6, 2010 1:26 PM0 commentsViews:

06 ऑगस्ट

कलावैभव नाट्यसंस्थेचे निर्माते मोहन तोंडवळकर यांचं शुक्रवारी दुपारी मुंबईत निधन झाले आहे. पुरुष, नातीगोती, गेला माधव कुणीकडे अशी अनेक दर्जेदार नाटकं त्यांनी रंगमंचावर आणली. जास्वंदी, प्रेमासाठी वाट्टेल ते त्याचबरोबर आता शंभूराजे या नाटकांची निर्मिती त्यांनी केली. पण फक्त नाटकांची निर्मिती करणे यापलिकडे जाऊन त्यांनी उत्तमोत्तम कलाकार रंगभूमीवर आणले अनेक नवीन कलाकारांना, दिग्दर्शकांना त्यांनी संधी दिली, त्यांचं हे ऋण मराठी रंगभूमी कधीही विसरु शकणार नाही. मोहनशेठ नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं. नुकतीच त्यांची 75वी साजरी झाली होती.

close