मतभेद नाहीत

August 6, 2010 2:05 PM0 commentsViews: 3

06 ऑगस्ट

मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यातले मतभेद जगजाहीर आहेत. पण आता विलासरावांशी दिलजमाई करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री अशोक चव्हाण करत असल्याचं दिसतंय. लातूर आणि नांदेडमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

लातूरमधली कार्यालय कुठेही हलवणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी लातूरकरांना दिली. त्यातूनच कुठेतरी विलारावांशी दिलजमाई करण्याचे संकेत अशोक चव्हाणांनी दिले. महत्वाचे म्हणजे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचही त्यांनी सांगितले.

close