हायकमांडने आदेश दिल्यास राजीनामा

August 6, 2010 2:48 PM0 commentsViews: 1

06 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्समधल्या भ्रष्टाचारासाठी मी जबाबदार नाही असा आरोप सुरेश कलमाडींनी फेटाळून लावला. जर पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांनी राजीनामा मागितला तरच राजीनामा देणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कॉमनवेल्थ गेम्समधल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आज पहिल्यांदाच आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी मिडियासमोर आले. नवी दिल्ली येथे सुरेश कलमाडी यांच्या हस्ते आज स्पर्धेच्या मेडल्सचं अनावर करण्यात आले. 84 लाख रुपये खर्च करुन कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी 1408 मेडल्स तयार करण्यात आली आहे.या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली.

कॉमनवेल्थ गेम्समधल्या भ्रष्टाचारासाठी मी जबाबदार नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असं कलमाडी यांनी यावेळी स्पष्ट केले केवळ पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितलं तरच मी राजीनामा देईन असं कलमाडींनी यांनी म्हटलं आहे स्पर्धेसाठीची सर्व बांधकामं जागतिक दर्जाची आहेत, आणि थोडीच कामं शिल्लक असून ती वेळेत पूर्ण होतील असा विश्वास कलमाडींनी व्यक्त केला.

close