विदर्भात मुसळधार पाऊस

August 7, 2010 10:48 AM0 commentsViews: 7

07 ऑगस्ट

मागील 48 तासापासून पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याची मोठी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे सगळे म्हणजे 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात धरणाचं पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासुन झालेल्या पावसानं चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळमधील अनेक नद्यांना पूर आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 111 मिली मिटर पावसाची नोंद झाली . रस्ते बंद झाल्यामुळे 70 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संबंध तुटला आहे. भंडारा जिल्ह्यातील असोला मेंढा धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे आसपासच्या गावातील लोकांना इतर ठिकाणी हलवण्याचं काम सुरु आहे.

विदर्भात विविध ठिकाणी वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यु झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प ,सायखेडा प्रकल्प ,चापडोह ही धरणं भरून वाहू लागली आहे. वर्धा जिल्ह्यातील पावसाचं प्रमाण सरासरी पेक्षा 45 % अधिक आहे.गोंदिया जिल्ह्यातील इटीया डोह हे धरणही 96% भरलं आहे. मुसळधार पावसामुळे शिरपूर धरणाचे 5 दरवाजे उघडले आहे. पुजारीटोला या धरणाचेही 8 दरवाजे उघडले. वर्धा, वैनगंगा ,पैनगंगा, वणा नद्या पुररेषेच्या खाली वाहात असल्यामुळे पुरपरिस्थीतीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस जोर कायम आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील इरई धरणाची सहा दार उघडल्यामुळे भद्रावती तालुक्यातअनेक गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

close