मराठवाडयात सर्वत्र पावसाची संततधार

August 7, 2010 11:09 AM0 commentsViews: 3

07 ऑगस्ट

मराठवाड्यातील सर्वचं जिल्हयांना शुक्रवार पासून पावसानं झोडपुन काढलं आहे. आज सलग दुसर्‍या दिवशीही मराठवाड्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. आतापर्यंत मराठवाड्यात सरासरी 57 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यात पुरात रवी टाक हा तरुण वाहुन गेला आहे. परभणी आणि हिंगोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. तर उस्मानाबाद, लातूर जिल्हयात पावसाची संततधार सुरु आहे. औरंगाबाद , जालना जिल्हयात शुक्रवार पासून सुर्यदर्शन झालेले नाही. मराठवाड्यात जोरदार पावसानं नदी, नाले, ओसंडुन वाहत आहे.

close