दीक्षाभूमीवर चोरीचा प्रयत्न फसला

August 7, 2010 11:18 AM0 commentsViews: 36

07 ऑगस्ट

नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी मध्ये काल रात्री 1:30 वाजताच्या सुमारास चोराने येथील दान पेटीमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र येथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅ मे-याने त्याचा हा प्रयत्न फसला. दीक्षाभूमी जवळ असलेल्या काचीपूरा भागात राहनारा आकाश उईके असं या चोराचं नाव आहे. तो रात्री दीक्षाभूमीच्या आत शिरला आणि त्याने येथे असलेल्या दान पेटीमधून पैसे काढण्यास सुरूवात केली. जवळपास 60 हजार रूपये काढून तो पळणार होता मात्र येथे सुरक्षेस तैनात असलेल्या पोलिस कर्मचा-याला तो कॅमे-यात आढळून आला. त्याने लगेचच आपल्या सहका-यांच्या मदतीने चोराला रंगेहात अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 60 हजार रूपये जप्त केले आहे.

close