सियाचीनमधले 28 जवान बेपत्ता

August 9, 2010 12:07 PM0 commentsViews: 2

09 ऑगस्ट

लेहमधला मृतांचा आकडा आता 156वर पोचलाय आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. सियाचीनमध्ये अचानक आलेल्या पुरांमुळे 28 जवान वाहून गेले आहेत. हे जवान पाक व्याप्त काश्मीरमध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जवानांना शोधण्यासाठी आता लष्कराने पाकिस्तानी अधिकार्‍यांना विनंती केली आहे. हरवलेल्यांमध्ये 3 जॉईंट कमांडिंग ऑफिसर्स आणि 15 बिहार इन्फन्ट्रीचे जवान आहेत. दरम्यान, झांस्कर व्हॅलीमधून 36 जणांची विमानाद्वारे सुटका करण्यात आली.

close