तेजस्विनी सावंतचं दिल्लीत स्वागत

August 9, 2010 12:20 PM0 commentsViews: 8

09 ऑगस्ट

म्युनिक वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये तेजस्वी कामगिरी करणारी तेजस्विनी सावंत सोमवारी सकाळी दिल्लीत परतली. यावेळी दिल्ली विमानतळावर तेजस्विनीचं जोरदार स्वागत करण्यात आले. म्युनिकमधल्या वर्ल्ड शुटींग चॅम्पियनशीपमध्ये तेजस्वीनीनं गोल्ड मेडल पटकावलं आहे.

50 मीटर रायफल प्रकारात 597 पॉईंट्स पटकावत तेजस्वीनीने गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. त्याचबरोबर तिने 50 मीटर रायफल स्पर्धेच्या वर्ल्ड रेकॉर्डशीही बरोबरी केली आहे. 1998 साली रशियाच्या मरिना बॉबकोव्हने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. या गोल्ड मेडलमुळे कॉमनवेल्थसाठी आपला आत्मविश्वास वाढल्याचं तेसजस्विनीनं आयबीएन-लोकमतशी बोलतांना सांगितलं आहे.

close