मालेगाव बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना

October 24, 2008 10:36 AM0 commentsViews: 5

24 ऑक्टोबर, मुंबईमालेगावमधील बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटनाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. या स्फोटाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एटीएस पथकानं इंदौरमधून एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. आरोपींना नाशिकच्या मोक्का कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मालेगाव स्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याची बातमी सर्वप्रथम ' आयबीएन लोकमत ' ने दिली होती. बॉम्बस्फोटामागचे खरे सूत्रधार हिंदू जागरण मंचाचे असल्याच्या वृत्ताला मुंबई पोलीस कमिशनर हसन गफूर यांनीही दुजारा दिला आहे. मालेगाव स्फोटाचं गूढ उकललं असून याप्रकरणी एका महिलेसह 4 जणांना अटक करण्यात आली. महिलेचं नाव प्रज्ञासिंग ठाकूर असल्याची माहिती हाती आली आहे. हिंदू जनजागरण मंचाची ती सदस्य असून तिच्यासह 4 जणांना नाशिकच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मालेगाव स्फोटात वापरण्यात आलेल्या मोटरसायकलीच्या नंबर प्लेटवरून एटीएस पथकानं आरोपींचा छडा लावला. ऐन रमजान महिन्यात गुजरातमधील मोडासामध्ये बॉम्बस्फोट झाले आणि त्यापाठोपाठ दोन दिवसांनी 29 सप्टेंबरला मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. हिंदू जागरण मंच हा सनातन संस्थेचा भाग आहे. सनातन संस्थेची लढावू संघटना, हिंदू जनजागृती समिती आहे आणि त्याचंच अंग हा हिंदू जागरण मंच आहे. यापूर्वी ठाणे आणि नवी मुंबईच्या नाट्यगृहातील स्फोटामागे सनातन संस्था असल्याचं तपासात आढळलं होतं.

close