जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातल्या गुन्हेगारांची ओळख पटली

August 10, 2010 12:59 PM0 commentsViews: 2

10 ऑगस्ट

पुण्यात जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती आली आहे. स्फोटातील गुन्हेगारांची ओळख पटली असून लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळेल अशी माहिती गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिली. या आरोपींचे पत्तेही पोलिसांना मिळाले आहेत, असंही आर.आर.पाटील यांनी सांगितले आहे. पण हे सर्व आरोपी फरार झाले असून ते देशाच्या वेगवेगळ्या भागात गेले असण्याची शक्यता आहे. पुण्यात 13 फेब्रुवारीला कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात 11 जणांचा बळी गेला होता.

close