तेलगळतीचा मुंबईजवळच्या समुद्रकिनार्‍यांना फटका

August 10, 2010 1:05 PM0 commentsViews: 4

10 ऑगस्ट

मुंबईत जेएनपीटीजवळ शनिवारी एमएससी चित्रा आणि खलीजिया या दोन जहाजांच्या टकरीनंतर एमएससी चित्रा या जहाजातून होणार्‍या तेलगळतीला थांबवण्यात यश आले आहे. पण या गळतीतील तेल आणि कंटेनर्स आता रायगडातल्या उरणच्या किनारपट्टीवर धडकले आहेत. या कंटेनरबरोबर जहाजावरील मालही किनार्‍याला आला आहे. या कंटेनर्समध्ये केमिकल्स असल्यामुळे किनारपट्टीचा भाग प्रदूषित झाला आहे.

किनारपट्टीवर तेलाचा तवंग पसरल्याने आणि रायगडच्या किनार्‍यावर वाहत आलेले कंटेनर्स पाहुन मच्छिमारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं आणि त्याचबरोबर कुतुहलाचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र जिल्हाधिकार्‍यांकडून कुठल्याही प्रकारची नोटीस इथल्या मच्छीमारांना दिली गेलेली नाही.

प्रकरणाच्या चौकशीचे सुत्र शिपिंग महासंचालकाकडे

तेलगळती प्रकरणी आता शिपिंगच्या महासंचालकांनी प्रकरणाच्या चौकशीची सुत्रं हातात घेतली आहे. तेलगळीतीमुळे समुद्राच्या पाण्याचे नमूने तपासण्याचे आदेश सरकारनं तहसिलदारांना दिले आहे तसेच हॉलंड आणि सिंगापूरची टीम कंटेनर हटवण्याचं एकत्र काम करत आहे. प्रदुषण रोखण्यासाठी कोस्टगार्डनं BNHS अर्थात बॉम्बे नॅचुरल हिस्टोरी सोसायटी ची मदत मागितली आहे.

BNHS च्या 10 ते 12 जणांची टिम मुंबईच्या पुर्ण समुद्र किनार्‍यावर समुद्रच्या पाण्याचे, वाळूचे सॅम्पल घेण्याचे काम करत आहे. दर दोन दिवसांनी हे काम करण्यात येणार आहे. मांडवा, सासवणे, रेवस ,अलिबागला इथे तेलाचे अंश सापडले आहे. या परिसरात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी करू नये तसेच, इथले मासे खाऊ नये, असं आवाहन पर्यावरण मंत्रालयानं केले आहे.

close